चौदावे रत्न दाखवणे
'चौदावं रत्न ' ---------------- भाषा हे संवादाचं माध्यम आहे. एकमेकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी भाषेचा महत्त्वाचा उपयोग होतो. 'माणूस हा समाजशील/सामाजिक/समाजप्रिय प्राणी आहे' हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोतच. 'समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनणे' माणसाला केवळ भाषेमुळेच शक्य होतं. मानवी भाषेत वेगवेगळे अर्थ संज्ञापित करण्याचं सामर्थ्य असल्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट आहे. साहजिकच भाषेत विविध सौंदर्यवृद्धी करणार् या घटकांची उत्तरोत्तर भर पडत गेली आणि अधिकाधिक मानवी जीवन भाषेच्या अंगानेही अधिकाधिक समृद्ध बनत गेलं आहे. म्हणी, वाक्प्रचार, अलंकार वगैरे गोष्टी भाषेला मनोरंजक आणि आपलीशी अशी बनवतात. रुक्ष भाषा कोणालाही आवडत नाही. एखाद्या भाषणात वक्त्याच्या आवाजात चढउतार नसेल, वैविध्य नसेल आणि एकसुरीपणा असेल तर सभामंडपात शेवटी वक्ता आणि मंडपवाला असे दोघेच उरतात. हीच खरी भाषेची गंमत आहे आणि आपल्याला ती तिच्या विविध अंगांसह अवगत असेल तर आपलं बोलणं कधीच कंटाळवाणं होत नाही. वाक्प्रचार हा एक भाषेचा अतिशय मजेदार घटक. अनेकदा वाक्प्रचा...