इमोजीबाईचा स्मार्टफोन अन् आजीचा 'डिजिटल' पापा! 😎🎊🏃🙈😊🐒🤗❤️ #Emojidayspecial
रोहनची आजी गावाकडे रहायची . वडिलांबरोबर आजीकडे गावी गेल्यावर टीव्ही बघण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा काही पर्याय उरत नसे. तिथे मोबाइल नेटवर्क नसल्याने . अगदी नेटवर्क नसल्याने शहरी परत आल्यावर आजीशी फोनवरसुद्धा बोलता येत नसे. कालांतरानं , गावी नेटवर्क आलं खरं , पण ते मध्येच यायचं मध्येच जायचं. रोहन नव्या पिढीचा प्रतिनिधी , अगदी ‘ जेन झी ’ च म्हणा ना ! त्याच्याकडे स्मार्टफोन होता , पण गावी इंटरनेटच धड नसल्याने तो कंटाळून एकदा बोललाही , “ आजी , इथे र्रेंज का येत नाही ? मला बोअर होतं ! ” आजी म्हणाली , “अरे आम्ही असेच दिवस काढले , आम्हाला रेंज-बिंज असली नसली तरी काही फरक पडत नाही. लोकांशी बोलणं , गप्पा मारणं आणि आपल्या संसारात रमणं. एवढं पुरायचं आम्हाला जगायला. “ रोहनला आजीचं म्हणणं जरा टोचलंच , पण त्याची पिढीच अशी आहे की मोबाइल हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे , तोही त्याला अपवाद नाही. त्याला वाटलं आताची त्याची भावना आजीला ‘ इमोजी ’ स्वरुपात पाठवता आली असती , तर किती छान झालं असतं ! “मग तर तुला ‘ इमोजी ’ म्हणजे काय हेही क...