Posts

Showing posts from April, 2019

माही Way

Image
सामान्यत: एखादा संघ जिंकला की त्या संघातीलच एखादा खेळाडू प्रमुख योगदान देतो आणि तो सामना त्याच्यामुळे लक्षात राहतो पण क्वचितच असं घडतं की जिंकणार्‍या संघापेक्षाही प्रतिस्पर्धी संघाचा एखादा खेळाडू अशी खेळी खेळतो की सामन्याच्या निकालापेक्षाही त्या खेळाडूची ती विलक्षण खेळी अधिक लक्षात राहते, चर्चेत राहते. आज झालेल्या बेंगलोर आणि चेन्नई संघातील सामन्यात नेमकं हेच झालं आणि यासामन्याचा हीरो होता भारताचा माजी कर्णधार, सुपरकुल यष्टीरक्षक फलंदाज एम.एस. धोनी ! अशा खेळी अनेकदा तो खेळून गेलाय तरीही या खेळीबद्दल लिहावंसं वाटतंय कारण ही खेळी त्याचं क्रिकेटिंग करिअर एका वेगळ्या वळणावर असताना आलेली आहे. महेंद्रसिंग धोनी ! नावात काय आहे असं शेक्सपिअरने म्हटलंय म्हणे पण या नावात जादू आहे आणि या नावामागे मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांचं पाठबळ आहे! या नावामागे कितीतरी अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव आहे. या नावामागे कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यामुळे क्रिकेटविश्व अजूनही ''धोनीssss धोनीssss" च्या घोषणा देत असतं. कधी घरबसल्या तर कधी स्टेडीयममधून. धोनीचा हा प्रवास अनेक टप्प्यातून इथवर आला आहे. या दरम्...