Posts

Showing posts from March, 2026
Image
  दिनांक 1 मार्च 2026 रोजी भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे येथे 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मायमराठी कलासंगम' महोत्सवात 'गझल कार्यशाळे'त मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेला हा लेख... 

अहमदाबादमध्ये भीमपराक्रम!

Image
  #आठलेकरी ---------------- गावाकडे एक म्हण आहे, 'रोज रोज काय दिवाळी नसते!' या म्हणीमागे जो काही अर्थ असेल, तो खराही असेल, पण मेहनत आणि चिकाटी जर तुमच्या अंगी असेल तर ही दिवाळी नक्कीच तुमच्यासाठी रोज-रोजही यायला तयार होईल एवढं नक्की! हे आज खरं करून दाखवलं भारतीय क्रिकेट संघाने! मागील टी20 विश्वचषक विजेता म्हणजेच गतविजेता भारत आपल्या घरच्या मैदानावर सलग वर्ल्डकप जिंकेल का ? इतिहासात आतापर्यंत तरी असं घडलेलं नाही,ऐनवेळी पुन्हा न्यूझीलंड घास हिरावून नेणार नाही ना, भारत 'इतिहास घडवेल का?' असे अनेक प्रश्न जवळजवळ प्रत्येक क्रिकेटप्रेमी स्वत:लाच प्रश्न विचारत होता! जागतिक क्रमवारीत नंबर 1ला असणारे बोलर-बॅटर दोन्ही भारताचे... जगातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भारताकडे, दणदणीत अशी फलंदाजी फळी अशी सगळी तगडी टीम असली तरी T20 मॅच म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं, जरा चूक झाली जरा तोल गेला की संपलं सगळं! भारताच्या संघानं मात्र यावेळी चंग बांधला होता! एकाचा तोल गेला तर दुसरा सावरत होता आणि पडण्याची वेळच येत नव्हती.एखादा अपवाद वगळता भारत राजासारखा खेळला. सर्वच मॅच उत्तम झाल्या आणि आज ...