Posts

Showing posts from June, 2021

आप्पा नावाचं आभाळ!

Image
  आई वडील म्हणजे आपल्या हृदयाचा हळवा कप्पा. आईविषयी बरंच काही लिहिलं जातं, लिहिलं गेलंय पण वडील तसे फारसे प्रकाशात येत नाहीत. आई आणि वडील दोघांच्याही उत्तम संस्कारामुळेच आपली मूर्ती घडत असते, आपण घडत असतो. आज फादर्स डे - पितृदिन त्यानिमित्ताने माझे वडील विद्याधर लक्ष्मण आठलेकर म्हणजेच आमचे 'आप्पा' यांच्याबद्दल चार शब्द .. माझे वडील त्याकाळचे इंटर. त्यामुळे इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व. चेहरा करारी आणि वृत्ती बाणेदार. आमची आई कर्नाटकची असल्याने वडिलांना आम्ही भावंडे 'आप्पा ' म्हणत असू. आप्पांचं लग्न झालं तेव्हा महाराष्ट्रात कर्नाटकहून फार कमी मुली लग्न होऊन आलेल्या होत्या आणि ज्या होत्या त्यांच्या घरात कन्नड बोलण्यास कडक विरोध होता. आप्पांनी मात्र आईला आणि नंतर आम्हाला कन्नड बोलण्याची मुभा दिली, कन्नडच नव्हे तर कुठलीही भाषा बोलण्यास कधीच विरोध असू नये कारण भाषा हे ज्ञानाचे द्वार आहे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे, 'विरोध वृत्तीला करावा व्यक्ती वा भाषेला नव्हे' असं त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणूनच आज मराठी-मालवणी सोबतच गोअन कोंकणी तसेच कन्नड भाषा मी लिहू-वाचूही शकतो...

मुखपृष्ठ किती महत्वाचं ?

Image
  ''Don't judge a book by its cover!"    असं आपण कितीही म्हटलं ना, तरीही नाव किंवा लेखक अगोदर माहिती नसल्यास पुस्तक लक्ष वेधून घेतं ते दोन गोष्टींमुळे :   १. शीर्षक २. मुखपृष्ठ   शीर्षकाबद्दल बोलायचं झाल्यास अनेकदा ती वेगवेगळ्या विचारातून आलेल्या प्रभावामुळे त्या त्या प्रकारे दिलेली असतात. कधी विषय तर कधी पात्र शीर्षकातून कळतं पण अनेकदा शीर्षक एक तर लहान अक्षरांत असतं किंवा त्याचं चटकन आकलन होत नाही. अशा वेळी मुखपृष्ठच लक्ष वेधून घेतं आणि ते पुस्तक उचलून घेत आत डोकावायला प्रवृत्त करतं. म्हणूनच मुखपृष्ठ हाही पुस्तकाचा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. मुखपृष्ठ हे पुस्तकातील विषयाला पूरक असावं, समर्पक असावं. मुखपृष्ठ पाहताच पुस्तकात डोकावण्याचा मोह व्हावा असं असावं. प्रत्येक वाचकाची आवड निवड, रंगाकडे आकर्षित होण्याची वृत्ती वेगवेगळी असते. काहींना भडक रंग आवडतात तर काहींना सौम्य. माझं म्हणाल तर मला सौम्य रंगातली आशय-विषयाशी नातं सांगणारी मुखपृष्ठे फार आवडतात. पुस्तकाचा विषय किंवा आशय अगोदर माहिती नसल्यास मी तरी भडक मुखपृष्ठापासून जरा लांबच राहतो. रंग जेवढा डो...

‘अहवाल’ : मराठी गझलेचा खणखणीत उद्गार

Image
     माणसाचं आयुष्य अनेक भावभावनांनी नटलेलं असतं , सजलेलं असतं. या भावभावनांची आंदोलनं , त्यांचं गारुड आणि त्यांची ओढ या सगळ्याचा परिणाम माणसाच्या प्रत्यक्ष जगण्यावर होत असतो. अपेक्षा , आकांक्षा , स्वप्नं ही याचीच काही रुपे म्हणता येतील ज्यांच्यामुळे मानवी जीवन सुलभ , सुकर होत असतं , सुसह्य होत असतं. अपेक्षाभंगाचं किंवा स्वप्नभंगाचं दु:ख म्हणूनच मोठं असतं. या दु:खावर मात करणं खूप कठीण असतं ; पण जर स्वप्नांनाच धुडकावण्याची वृत्ती तुमच्या अंगी असली तर.. तर तुम्हाला त्या दु:खाचं काही वाटत नाही , कारण मुळात तुम्ही स्वप्नापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवता व सत्याचा सामना करण्याची ताकद अंगी बाळगता. ही वृत्ती हा तुमचा बाणा बनते. जगण्याकडे अधिक डोळसपणे पहायला शिकवते , जगायला शिकवते. म्हणूनच कल्याणचे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य जेव्हा म्हणतात ,   सुरुवातच आयुष्याची स्वप्ने धुडकावत केली जगण्याची ही रणनीती मी तेव्हा अवगत केली ..   तेव्हा त्यांच्या ओळींमधील हा जोरकसपणा तुमच्या मनावरही ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही.        ...