Posts

Showing posts from November, 2022

👑 राजा नेहमी राजा असतो ! 👑

Image
  पु.ल. देशपांडे यांच्या 'वार् ‍ यावरची वरात' मधल्या साक्ष देणार् ‍ या म्हादबाच्या तोंडी एक वाक्य आहे : "मला सांगा, 'रावणानं रामाची बायको पळवलीआणि रामानं रावणाची दहा मुंडकी खापलून आपल्या बायलेला परत आणली... 'एवढ्यात सपलं का रामायण? " विराटच्या बाबतीत सांगायचं तर अगदी असंच म्हणावं लागेल! विराट प्रेम कोहली... हे वादळच असं आहे की त्याला असं शब्दांत कोंडता,बांधता येणार नाहीच, पण आज विराटचा वाढदिवस आहे, म्हणून त्यानिमित्ताने हा लेख ... तो प्रथम दिसला तो अन्डर 19 संघात, मला वाटतं क्वालालंपूरमध्ये भरलेल्या वर्ल्ड कपमध्ये. थोडासा गुबगुबीत, मध्यम उंचीचा, 'बॅड-बॉय' टाइप लुक आणि वागणं असलेला हा विराट नाही म्हटलं तरी एकाच वेळी मनात भरला आणि डोळ्यांतही! काहीतरी वेगळं आहे एवढं कळलं पण त्यावेळी सौरभ गांगुलीचा शर्टवाला किस्सा सोडला तर इतका आक्रमक आणि अतरंगीपणा आपल्याला नवीनच होता. 2008मध्ये श्रीलंका दौर् ‍ यात त्याला संधी मिळाली खरी पण साधारणपणे 2009 पासून त्याची कारकीर्द खर् ‍ या अर्थाने सुरू झाली. दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या विराट कोहलीला लहानपणापासूनच ...