मालवणी लघुकथा : 'नवस'
गावकारवाड्याकडसून पातळेश्वराकडे जाताना कोपऱ्यार बारक्याशा घरात मधू टेमकार ऱ्हवा. घर म्हणाक फक्त घर ता. खरा तर ती झोपडीच पण मागल्या वर्सा मधग्याक खयतरी मटको लागलो तेवा चार मेडी पुरून आणि वर वासे बिसे टाकून गावठी नळे घालून घेतल्यान वरते म्हणान तेका घर म्हणायचा इतक्याच. मधग्याक तीन पोरा. दोन चेडवा आणि एक झिल- बाबलो! मधग्याक दारूची सवय कोणी लावली माह्यत नाय पण बाबल्याच्या बघण्यात असो एकय दिवस जावंक नाय जेव्हा मधगो पिवन येवक नाय. बाबल्याची आवस म्हणजे मोनी गाय! बापाशीन मधग्यावांगडा लगीन लावन दिल्यान म्हणान गप तेच्यावांगडा संसार करी. हुं नाय की चूं नाय. कोणाचो तरवो लावक जा, कोणाचे रतांबे फोडुक जा कोणाचे कपडे धुवक जा असा करून बिचारी घर चलय. मधगो मधी मधी पैसे हाडी पण ते तेका दारूकच पुरत नाय. मोठी दोन चेडवा तेंचा नशीब बरा म्हणान चांगल्या घरात पडली. नाईकांच्या सुनल्यान स्थळा हाडल्यान मुंबईकर चाकरमानी. एक तेचो पाव्हनो आणि दुसरो तेचो वांगडी. सगळी परस्थिती अगोदरच सांगलली असल्यामुळे दोघांनीव नारळ आणि चेडू देवा आमका बाकी काय नको.. अशी मागणी घातल्यानी आणि ...