कवी आणि कविता : चिंतन
•============• कविता म्हणजे विश्व आहे, कवेत न सामावणारं. मनाचं एक अंगच जणू. कवितेची व्याख्या करण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला आणि प्रत्येकाने त्याची त्याची अनुभूती मांडली. कवी कोणत्याही भौगोलिक प्रदेशातील असो त्याचं आणि कवितेचं नातं सारखंच असतं फक्त मांडणी निरनिराळी असते इतकंच! Aristotle म्हणतो ''Poetry is finer and more philosophical than history; for poetry expresses the universal, and history only the particular. '' तर Wordsworth म्हणतो, 'Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquillity.' खरं तर कविता आणि कवी एकमेकांशी एक अतूट धाग्याने बांधले गेलेले असतात एकमेंकांच्या सुखद:खाचे वाटेकरी असतात. विविध घटनाक्रम त्यांचं महत्व अधोरेखित करत असतात, यातूनच कवी वेगवेगळे प्रदेश पादाक्रांत करत असतो. म्हणूनच Matthew Arnold म्हणतो, 'Poetry is simply the most beautiful, impressive, and widely effective mode of saying things, and hence its importance.' कविता कुठून येते कुठे नेते कशी नेते हा सगळा ...