Posts

Showing posts from June, 2019

साऊथम्पटनमध्ये विजयाचा शुभशकुन

Image
   खरं तर कालच्या सामन्याविषयी लिहायचं होतं पण एखादा लेख मनासारखा लिहिला जाण्यासाठी जो वेळ मिळणे आवश्यक आहे तो/तितका वेळ आणि इच्छा यांची गळाभेट काही केल्या झालीच नाही दिवसभर पण लिहिल्यावाचून चैन पडेना कारण हा आपला पहिला सामना!    कालचा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेला सामना आफ्रिकेसाठी फार महत्वाचा होता तर भारत या सामन्याद्वारे वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करत होता. दक्षिण आफ्रिका हा संघ मला नेहमी शापित गंधर्वासारखा वाटतो. शाप तर ते भोगत आहेतच पण त्यांना उ:शापही मिळाला असेल, तो कधी प्रत्यक्षात उतरतोय याची मी एक प्रामाणिक क्रिकेटरसिक म्हणून वाट बघतोय. केप्लर वेसल्स, अॅलन डोनाल्ड, क्रोनिए, ऱ्होड्स, पोलॉक पासून ते  कॅलिस, आमलापर्यंत अनेक दिग्गज व गुणी खेळाडू तसेच एबी डिव्हीलीयर्ससारखा दैवी देणगी लाभलेला खेळाडू यांचं योगदान मिळूनही आफ्रिकेची पाटी मात्र कोरीच राहिली. चुकतंय हे कळतंय पण काय..? शोध घ्यायला हवा! हा शोध जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हा शापित गंधर्व शापमुक्त होणार नाही आणि दैवी सूर आसमंतात  घुमणार नाहीत. कालच्या सामन्यातही तेच जा...