Posts

Showing posts from July, 2021

साधेपणाचा कळस !

Image
                                      रविवारची प्रसन्न सकाळ. नाकावरून खाली घसरणारा जाड ठसठशीत काळ्या फ्रेमचा चष्मा आपल्या विशिष्ट पद्धतीने वर सरकवत वसंतराव हॉलमधील सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत आहेत. वर्तमानपत्रातील एखादी खुसखुशीत बातमी वाचतानाच आवडीच्या चहाचा घोट घेणार इतक्यात धड मिशीही न फुटलेला विशीतला त्यांचा नातू हेडफोन लावून ओरडतच बाहेर येतो ..   “ आज ब्ल्यू है पानी पानी पानी पानी पानी और दिन है सनी सनी सनी सनी सनी ssssssssss!!!”   “अरे काय हे ध्यान ?? काय झालंय काय आजच्या पिढीला ?” “ यो!कमऑन आजोबा ! आजची स्टाईल आहे ही ! ब्रॅंड..ब्रॅंड म्हणतात याला ! तुम्हाला नाही कळणार! टाइम हॅज चेंज्ड !” नातवाची मुक्ताफळे. “कपाळाची स्टाईल! मेल्यांनो , जटा काय वाढवताय , पॅंट्स काय फाडताय , गाड्या काय उडवताय..” आजोबा आणि नातू यांच्यात चांगलंच परंपरानाट्य रंगत होतं. “आजोबा , यालाच ‘ स्टेट्स स...