दिनांक 1 मार्च 2026 रोजी भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे येथे 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मायमराठी कलासंगम' महोत्सवात 'गझल कार्यशाळे'त मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेला हा लेख...
मन अगम्य आहे, अज्ञेय आहे, मनात किती आणि काय असेल सांगणं कठीणच. मनाच्या कितीतरी व्याख्या केल्या गेल्या आहेत, शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत तरीही पुढील प्रत्येक क्षणागणिक नवीनच शक्यता समोर येतच राहते. म्हणूनच जसा घरातील वॉर्डरोब आपण उघडून बघत असतो तसाच हा मनाचा वॉर्डरोब उघडून नित्यनूतन शक्यतांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.