वृत्तबद्ध कविता, भाषा आणि शब्दनिर्मिती
भाषा हा कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा आधार. संवादाचं माध्यम म्हणजे भाषा. आपण सारे जाणतोच की लिखित आणि बोलली जाणारी असे साधारणत: वापरानुसार भाषेचे दोन भाग पडतात. दुसर् या प्रकारात विशिष्ट असेचं शब्द येतील किंवा आले पाहिजेत असं काहीही बंधन नसतं, नसावं पण लिखित प्रकारामध्ये मात्र तसं असतं. (त्याची कारणं आणि स्पष्टीकणं नंतर पाहू, तो आताचा मुद्दा नाही. ) ही लिखित भाषादेखील कालानुरूप बदलत असते आणि त्याचवेळी त्यात नवीन भरही पडत असते. यावेळी अजून एक घटक या भाषाबदलाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे परकीय/द्वितीय भाषेचा प्रभाव. या सर्व मंथनातून अनेकदा होतं असं की दुसर् या भाषेतले सोपे शब्द आपल्या भाषेत घेतले जातात ( बॉरोड ). वापरानुकूलता हा निकष लावता ही एक स्वागतार्ह प्रक्रिया म्हटली पाहिजे पण याचवेळी अजून एक गोष्ट घडत असते ती म्हणजे आपल्याच भाषेतले पूर्वीचे शब्द हळूहळू कमी वापरले जातात. त्यामुळे अनेकदा पुढील पिढीला पर्यायी मराठी शब्दचं आठवत नाही. वाचन मर्यादित असेल तर ही अडचण अधिक परिणामकारकरित्या जाणवते. याला ठोस असा काही उपाय नस...