तो परत आलाय : दिनेश कार्तिक द फायटर !
तो 'परत' आलाय ! ______________ सकाळ होते म्हणता म्हणता रात्रच झाली तर ? काळोखाची फक्त पालखी दारी आली तर ... ? कल्पना करा! काय वाटेल ? काळोखानंतर उजेड आणि रात्रीनंतर पहाट होणे हा तसा निसर्गक्रम, पण असं झालं नाही तर? हे असं होऊ नये आणि आपल्याला ते भोगावं लागू नये अशी इच्छा सर्वांचीच असते, पण नियती कुणाच्या नियंत्रणाखाली असते का ? नशीब कुणाचं कधी ऐकतं का ? जर नियतीने कुणाचं ऐकलं असतं तर कृष्ण कुमार आणि पद्मिनी कृष्ण कुमार यांच्या मुलाची ससेहोलपट रोखता आली असती ना? तसं होणं हे विधिलिखित नव्हतं. त्यामुळे या दांपत्याच्या मुलाच्या नशिबात अनेक चढउतार आले. डोळ्यांसमोर काळोख दाटला, चटके सोसावे लागले, धक्के मिळाले, निराश झाला पण पुन्हा उभा राहिला. नशिबाशी दोन हात करण्यास पुन्हा सज्ज झाला. त्याचं करियर संपलं संपलं म्हणेपर्यंत पुन्हा उगवला. अशा या जिद्दी मुलाचं नाव आहे - कृष्ण कुमार दिनेश कार्तिक ! होय, आपला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक ! तमिळनाडू राज्यात चेन्नईमध्ये ०१ जून १९८५ रोजी जन्मलेल्या दिनेशचे वडील कृष्णकुमार प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि आपल्या मुलानेही क्रिकेटमध्येच ...