Posts

Showing posts from March, 2019

स्पर्शफुलांची गाणी

Image

रूढ अर्थाच्या पलीकडे पाहणारा कवी : ग्रेस

Image
  ''मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरी खोल ___ ''  असं सहज पण सूचक विधान करणाऱ्या महाकवी ग्रेस यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कवितेबद्दल बोलायचं तर धाडस हवं, धाडस या खोल नदीत डुंबण्यासाठी आणि शक्य झाल्यास तरून जाण्यासाठी. न जाणो या प्रवासात आपल्यातील दगडाचं एखादं फुलही होईल कदाचित, म्हणून हे डुंबणं ... कवी ग्रेस यांची कविता दुर्बोध आहे, सहजासहजी कळत नाही वगैरे कितीतरी वाक्ये, समज किंवा विधाने कविता हा शब्द परिचित झाला तेव्हापासून कुणा ना कुणाकडून सतत ऐकलेली. त्यामुळे सुरुवातीला एक दोन कवितांव्यतिरिक्त मजल जाऊ शकली नव्हतीच पण जसा जसा कविता आणि तिच्या व्यापकतेचा अंदाज आला, तिच्याशी वारंवार संवाद साधण्याइतपत समज आली तेव्हा मात्र ग्रेस खुणावू लागले अर्थात मनात दडी मारून बसलेल्या सर्व पूर्वग्रहांसह. ग्रेस वाचता वाचता लक्षात आलं हे रसायन वेगळं आहे. काहीतरी जादू आहे या लिखाणात. ही कविता वेगळी आहे. ती गारूड करते, खेचते आपल्याकडे..पुन्हा पुन्हा. का? शोध सुरू झाला अजूनही सुरूच आहे. ग्रेस आणि त्यांच्या कविता वाचता वाचता हा माणूस आपला वाटत जातो. आत घुसत जातो. खोल काहीतरी हलत राहतं न...

आयुष्य अनमोल आहे...

Image
_________________ कधी कधी म्हणजे खरं तर नेहमीच मला काही लोकांच्या   वागण्याचा हेतूच कळत नाही आणि या लोकांना स्वतःला तरी आपल्या आयुष्याचा हेतू समजला आहे की नाही याबद्दल शंका येते. आता मी वाचलेली ही बातमी. >>>रेल्वे रूळावर बसून पब्जी खेळण्यात दंग असणाऱ्या दोन युवकांना रेल्वेने चिरडले <<<<  अरे काय करायचं होतं नक्की? काय झालं ? काय साध्य झालं??    डिजिटल वगैरे क्रांती झाली खरी पण त्यामुळे शांती नष्ट झाली आणि कदाचित त्याबरोबरच बुद्धीही भ्रष्ट झाली. हातात स्मार्टफोन काय आला नको नको ती थेरं सुचायला लागली. ते एक सेल्फीचं फॅड..बरं फॅड वगैरे ठीक आहे पण मॅड होईपर्यंत नका जाऊ देऊ ना हे फॅड! सेल्फी कुठे घ्यायचा?? तिकडे आंबोली घाटाच्या धबधब्याच्या झोतात ठिसूळ दगडांवर! मरणारच ना रे? घरच्यांचा काही विचार? काय महत्वाचं-- फेसबुक लाईक्स/कमेंट्स की घरच्यांचं प्रेम/माया? स्मार्टफोन म्हणजे अवघड जागचं दुखणं झालंय असं म्हणायची पाळी आलीय हळूहळू. जरा कुठे सगळं सुरळीत चाललंय असं वाटावं तर पुन्हा अशा काही बातम्या येतात आणि मन सुन्न होतं. मित्रहो, 'आयुष्य खूप सुंदर ...

किन्नर : समाजाची अविभाज्य तिसरी बाजू!

Image
 मी टीव्ही फार पाहत नाही त्यामुळे एका वाहिनीवर सुरू असणारा 'कानाला खडा' कार्यक्रम पाहण्याचाही योग सहसा येत नाही पण आज कामावरून परतलो तेव्हा टीव्हीवर हा कार्यक्रम चालू होता आणि त्यामध्ये कुणीतरी तृतीयपंथी व्यक्ती बोलत होती. तृतीयपंथीयांबद्दल माझी नेहमीच सकारात्मक भूमिका असल्याने मी साहजिकच कार्यक्रम पाहू लागलो. उत्तम मराठीत बोलणाऱ्या व्यक्तीने ( जिचे नाव गौरी सावंत आहे असे कळले ) जे काही सांगितलं त्याने फार वेदना झाल्या. तृतीयपंथी ज्यांना किन्नर/हिजडा/छक्का अशा अनेक नावांनी आपण संबोधतो. संबोधतो कसले जवळजवळ हिणवतोच. आपल्यासारखीच तीही माणसं आहेत, त्यांनादेखील अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांखेरीज इतर भावना आहेत हे अनेकदा नाही नेहमीच आपण विसरतो किंवा सरळसरळ नाकारतो. त्यांनाही त्यांची नावे आहेत/असतात त्या नावाने त्यांना हाक मारली त्यांच्याशी मैत्री केली तर त्यांना चांगलंच वाटेल, कारण त्यांनाही भावना आहेत. यांना समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न सर्वत्र, सातत्याने झाला पाहिजे. गौरीने वैद्यकीय सेवादेखील दुजाभाव करत असल्याचं सांगितलं तेव्हा फार वाईट वाटलं. खरं तर ...