Posts

Showing posts from May, 2019

बेन स्टोक्सचा मास्टरस्ट्रोक

Image
“पूर्वीसारखं पुणं आता राहिलं नाही”  असं म्हणणारी एक प्रजात जशी अस्तित्वात आहे तशीच “पूर्वीचं क्रिकेट आता राहिलं नाही, आमच्यावेळी काय प्लेयर्स होते…” वगैरे म्हणणारीदेखील एक प्रजात अस्तित्वात आहे. म्हणजे हे सगळीकडेच असतं. काही माणसं कालानुरूप बदलायला तयार नसतात, त्या जुन्या त्याच गोष्टी उराशी कवटाळून बसलेल्या असतात पण “Change is the only constant thing” हा सृष्टीचा, निसर्गाचा नियम असताना क्रिकेट तरी त्याला अपवाद कसं ठरेल ? 1975 साली सुरू झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून ते आताच्या  2019 च्या बाराव्या विश्वचषकादरम्यान अनेक बदल झाले, अनेक नियम आले, टी-20 सारख्या अतिझटपट क्रिकेटचा प्रसार झाला, त्याचाही विश्वचषक आयोजित होत असतो. अनेक छोटे मोठे बदल झाले, होत आहेत. त्यामुळे 50 षटकांच्या क्रिकेटचं वलय कमी झालेलं असलं तरीही ती एकदिवसीय सामन्याची जादू अजूनही कायम आहेच. कारण टी-20 हा टीझर असेल तर 50 षटकांचा सामना हा अख्खा चित्रपट आहे आणि कितीही सुंदर टीझर बनवला तरीही पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय पोट भरत नसतं! तर असा हा अतिशय प्रिय असा क्रिकेटचा खेळ आणि त्याचा हा महोत्सव आता इंग्लं...