“बाबी..भटजी येव्क नाय हत आजून, खय रवले बघ रे ..”

“बाबी .. गणपती पाटार ठेय रे ..”
“बाबी .. घरकारणीक बरा नाया, वायच डॉक्टराक बोलवन हाड रे ..”
“बाबीभावजी.. मोटर बंद पडलीहाशी वाटता, वायच बघा ओ..”
“बाबीकाकानू.. आकाशकंदिल बनवन देवा मओ...”
दिवसभर गावातल्या न्हान झिल्ग्यापासून ता म्हाताऱ्या-जाणत्यापर्यात हडे नायतर थडे बाबी नावाचो जप निसतो चालू आस्ता आणि बाबी पायाक चाका लावल्यावरी फिरत आस्ता. ह्या आता रोजचाच झाला हा, इतक्या की जर बाबी नस्लो तर खयच्याय मोठ्या कामाक जान्तेसुद्धा हात घालूक बघूचे नय अशी परस्थिती.
बाबूराव सीताराम मोचेमाडकर उर्फ बाबी .. चांगल्या सा फुट उभ्या –आडया पसारलेल्या आंगार पोटाक खिसो आसनारा हातकाप्या आंगातला, खाली जमनिची चौकशी करत चलणारा सुती धोतार, डोक्यार वार्याान उडान जानंत नाय म्हनान जसो काय पुरावो देवच्यासाठी रव्लेले केस आणि दुष्काळात पानी गावला नाय म्हनान वाढाक नाय म्हणणार्यान पिकासारे दाढीचे खुटे असो अवतार आसनारो म्हापुरूस दिसलो की समजान जायचा .. होच तो बाबी ! तुम्ही तेच्याकडे बघीत रव्ल्याचा तुमच्या लक्षात येवच्या आधी तुमच्या कानार हाक येतलीच ..
“पावण्यानू, काय ओ काय कंडिक्षन काय आसा नक्की ?”
बाबीचे काही आवडते खास इंग्रजी शब्द आसत, ते त्याका वाटात थय तो वापारता.वापारता कसले सरळ तोंडार मारता. त्या शब्दांचो अर्थ बाबीक म्हायत आसता की नाय देवाक माहीत! ‘कंडिक्षन’ ‘इष्टक’ ‘फ्रॉम’ ‘ड्राक’ ‘एस्प्रेट’ असे हडेसून तडेसून जमयलले हमखास चुकीचे शब्द मागचोपुढचो विचार करता बाबी मतर बिनधास्त बाण सोडतत तसे सोडीत आसता. बाबी तसो जास्त शिकलो नाय. शाळेत जीव रमंना तेचो, त्यामुळे अभ्यासव जायना. कोणाचा वगीच ऐकान घेवची सवय मालवणी मान्साक नसताच कधी, बाबीक तरी कशी आसतली? शाळेन बाबीक सोडूच्या आधी म्हनानच बाबीनच शाळेक सोडल्यान..इतको बाबी स्वाभिमानी !
“ गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी ? शाळा-बिळा ही लचांडा आमच्या कामाची नाय ह्या कळळा तेव्हाच दिलय सोडून.. चार कुनगे शेती हा धा माड, पाच आंबुले आनी वीसपंचइस धरते काजी हत ते पुरे झाले पॉट भरुक ..!”
बाबीचा स्वत:चा असा तत्वज्ञान आसा ता असा. म्हनांनच भौतेक बाबी न्हेमी समाधानी आसता. तो समाधानी असण्याची आजूनव जी कारणा हत ती म्हणजे ‘आपला काम झाला तरी बाजूक ठेवन अड्ललो आसात तेका पयली मदत करणा’ ह्या आपला कर्तव्यच आसा असा मानणा.
असाच एकदा टेंबावयल्या दाजी सावताकडे लगीन होता. सगळी तयारी झाली, लगीन लगाक इला आणि लक्षात इला रोवळी नाय हा! आता काय करतलास ? शुक्रवार आसल्याकारणान बाजारव बंद ते दिसा. सगळे टेंशनमध्ये होते. तितक्यात बाबी थय हजर झालो. अडचण कळली आणि अर्ध्या तासात बाबीन रोवळी लगीनमाटवात हजार केल्यान! ती रोवळी बाबीन खयसून आणि कशी हाडल्यान ह्या बाबीकच माहिती! एक नाय दोन .. बाबीन केलेली कामा सांगाक लागलो तर याक पुस्तक पुराचा नाय. कोणाचो बारसो आसांदे की कोणाची मयत बाबी मदतीक आसतलो म्हणजे आसतलो.
सदी लोकांच्या गर्दीत रवणारो बाबी घरात मतर एकटो होतो. आव्स तो न्हान आसतानाच वारली. बापाशीन तेका मोठो केल्यान असा म्हणाचा तर बापुस दारयेच्या नशेतच जास्त आसायचो. तोय लवकरच गेलो. आव्स-बापुस नसतानाय जमात थय जम्तीत तशी कामा करून बाबी मोठो झालो. सगळो विश्वास रवळनाथावर. शेजार्यासपाजार्याजनी, आवाठकरांनीच तेका सांभाळलो. लग्नाचेव खूप प्रयत्न झाले पण लगीन जावक नाय. बाबीन ह्या दु:ख कोणाकच कधी दाखव्क नय की सांगाक नाय. इतकी शक्ति आणि बुद्धी तेका आसणा ही रवळनाथाचीच कृपा म्हणाक व्हयी. बाबी घराबाहेर पडलो की तेच्या तोंडार जा हसणा आसायचा तेतुर लोकांची दु:खासुधा विरघळान जायत.
“ आपला रडगाणा नाय कधी गायचा,
लोकांकडे बघून लोकांसाठी हसायचा”
बाबी मूडमध्ये आसलो काय कवितेसारो बोलता आणि तेच्या वागण्यातव ती कविता दिसता. आपल्या न दिसणार्यास दु:खावर लोकांच्या सुखाची चादर ओढणारो बाबी कामाशिवाय कोणाच्या गजालीक कमीच बसता पण बसलो की जा काय सांगता ता ऐकून बाबी नावाचा रसायन म्हणजे काय चीज आसा ह्या सगळ्यांका कळान चुकता. आपल्याक आयुष्यात गावलेल्या अनुभवांची ढाल घेव्न तो गाकऱ्यांच्या पुढे कायम चलत आसता. तेचे गोष्टी ऐकण्यात तुम्ही मग्न आसतास इतक्यात खायल्या वाडयातसून गावडेकाकीचो आवाज येता...

“बाबीssssss सिलेंडर संपलो sssss”

आणि अजून एक सुखाची चादर ओढूच्यासाठी बाबीची पावला एस्प्रेट वेगात चलाक लागतत...
~ अनिल विद्याधर आठलेकर


Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !