'मी आणि माझा बाप' पुस्तक रसास्वाद
ध्ये जशी रूचीपालटाची जागा असते त्याचप्रमाणे वाचनातही रुचीपालटाचं वेगळं महत्व आहे. अनेकदा असं होतं की आपण एकाच पठडीतलं वाचत जातो आणि एका क्षणी एक थांबा येतो जिथे आपण खूप वेळ रेंगाळतो. हे रेंगाळणं जाणूनबुजून नसतं तर ती एक अपरिहार्यता असते. अशा वेळीच हा रूचीपालट उत्प्रेरकाची भूमिका बजावतो. काहीवेळा एकच पुस्तक तुम्ही वाचत असता पण त्यातील विषय कदाचित तुम्हाला फार गुंतवून ठेवू न शकल्यामुळे असेल किंवा अतिवर्णनात्मक शैलीमुळे असेल, तुम्हाला रूचीपालटाची गरज भासते किंबहुना असते. अशावेळी एका हलक्याफुलक्या विषयावरील, एखादं अनोख्या शैलीतील पुस्तक हाती आलं तर? मजा येईल नाही ?
माझ्या वाचनाचे विषय तसे भाषेच्या अंगाने जाणारे अधिक, त्यामुळे अनेकदा अभ्यासाच्या अंगानेच वाचन होतं, त्यावेळी कंटाळा येत नाही पण केवळ तेवढंच वाचून मन भरत नसल्यानं साहजिकच इतर पुस्तकंही खुणावत असतात. गेले काही दिवस मी रस्कीन बॉन्डचं 'THE ROOM ON THE ROOF' वाचत आहे. पुस्तक छान आहेच पण परवा का कोण जाणे ते पुस्तक सुरू ठेवून दुसरं काहीतरी वाचावं असं वाटलं. माझ्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तकं चाळताना नेमकं व्यंकटेश माडगूळकर यांचं 'मी आणि माझा बाप' पुस्तक समोर आलं. माडगूळकरी शैलीशी मी सुपरिचित असल्यामुळे तेच पुस्तक वाचायचं ठरलं आणि एका बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून संपलंदेखील! गेल्या काही महिन्यांचा विचार करता एका बैठकीत संपवलेलं हे पहिलंचं पुस्तक.
'मी आणि माझा बाप' (मेहता पब्लिशिंग हाऊस) हा रूपांतरित कथासंग्रह आहे. 'कार्लो बुलोसान' नावाच्या एका फिलिपिनो लेखकाच्या 'लाफ्टर वुइथ माय फादर' या पुस्तकातील कथांचे मराठी रूपांतरण म्हणजे 'मी आणि माझा बाप' हा कथासंग्रह. या कथेतील फिलिपिनो लोकांचे चित्रण माडगूळकरी शैलीत मराठी/भारतीय संदर्भांसह वाचताना विशेष मजा येते.
या कथासंग्रहात एकूण १२ कथा आहेत. बाप आणि लेक यांच्यातील नात्यांचे विविध कंगोरे यात मजेदार पद्धतीने चित्रित केले आहेत. खरं तर संपूर्ण कथासंग्रहाचा विचार करता बाप आणि लेक यांचं व्यक्तिचित्रही मस्त उभं केलं आहे. यातील गावरान विनोद अगदी वाखणण्याजोगा आहे. फिलिपिनो व्यक्तींचं केलेलं झकास भारतियीकरण, योग्य भारतीय संदर्भ (Indianness), दैनंदिन कौटुंबिक घटनांचं खुसखुशीत चित्रण, गावरान संवाद हे सर्व घटक कथा वाचताना तुम्हाला गुदगुल्या करत राहतात. मग तो कोर्टातील सीन असो की गावात तीन शहरी मास्तरणी येण्याचा, बापाचं स्वत: वारण्याचं नाटक असो की महादेवकाकाचा बिलंदरपणा असो प्रत्येक गोष्टीत एक पकड आहे. वाचक गोष्ट संपवेपर्यंत कल्पना लढवत राहतो किंवा हसत राहतो किंबहुना घटना जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करण्याची लेखकाची हातोटी प्रत्येक गोष्टीगणिक तुम्हाला खिळवून ठेवते. कथासंग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की यात माणसांबरोबरच प्राण्यांनाही विशेष महत्व दिलेलं आहे. पांढरा घोडा, झुंजीसाठी पाळलेला कोंबडा, टकरीचा एडका, कुत्रे, म्हैस असे प्राणी यातील कथांमध्ये ठळकपणे आपलं अस्तित्व दर्शवतात आणि कथेची रंगत वाढवतात.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सकारलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकाला अगदी साजेसं आहे. शेजारी इतर गोष्टीत असणार्या प्राण्यांसह हातात झुंजीचा कोंबडा घेऊन घोड्यावर बसलेला अतरंगी बाप अतिशय सुंदररित्या चितारलेला आहे. ''Don't judge a book by its cover '' ही म्हण इतर ठिकाणी खरी होत असली तरी इथे मात्र नेमकं मुखपृष्ठ तुम्हाला आतील मजकुराची झलक नक्की दाखवतं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 'बनगरवाडी', 'माणदेशी माणसं, 'गावाकडच्या गोष्टी' या पुस्तकांची मुखपृष्ठदेखील नेमकी आणि परिणामकारक आहेत. माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांचं हे वैशिष्ट्य आहे. पेपरबॅक स्वरुपात असणारा हा कथासंग्रह हाताळायलासुद्धा अगदी हलकाफुलका आहे. मूल्यही नाममात्र आहे.
व्यक्तिचित्रणे तसेच कथासंग्रह वाचण्याची आवड असणार्यांनी हा कथासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे. केवळ स्वत:लाच नाही तर इतरांनाही वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कोणतं पुस्तक भेट द्यायचं असेल तर हे पुस्तक एक उत्तम भेट आहे. तुम्ही एकाच विषयाची पुस्तके वाचून दमला असाल, थांबला असाल तर तुमच्या मनावरील भार हलका करण्यासाठी रूचीपालट म्हणून आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे, एवढं मात्र निश्चित..
कथासंग्रह : 'मी आणि माझा बाप'
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत : फक्त ८० रुपये
__ अनिल विद्याधर आठलेकर

खाण्याम
Comments
Post a Comment