सुभगपहाट
(वृत्त : कुड्मलदन्ती )
सुंदर कांती रविकिरणांचे
दूत दिशांना उठवत येती
पीत सुखाने कुसुमकरांचे
स्पर्श पहाटे नवथर न्हाती
धुंद धुक्याची अनुपम शोभा
पाहत खेळे अवखळ वारा
मुग्ध ऋतूची सुखद सफारी
नित्य नव्हाळे जपत शहारा
वृक्ष लतांची लगबग न्यारी
ऊब जराशी जपत उराशी
खार कुठेही सहज उनाडे
कोकिळ गाई सुमधुर भाषी
पाखरनक्षी नभपट व्यापी
घेत भरारी भरभर भारी
काढत येती अनवट काही
रंगकमानी क्षितिजकिनारी
गोप-गुराखी चरवत गायी
पाहुन सोने हिरवट घेती
माड नदीच्या अलगद कानी
गूज स्वतःचे कळवुन देती
पाय निघेना रविकिरणांचा
रम्य नजारा मनभर दाटे
सौख्य पहाया म्हणुनच येती
रोज नव्याने सुभग पहाटे ...
©अनिल विद्याधर आठलेकर
बुधवार, १२ डिसेंबर २०१८
पाहत खेळे अवखळ वारा
मुग्ध ऋतूची सुखद सफारी
नित्य नव्हाळे जपत शहारा
वृक्ष लतांची लगबग न्यारी
ऊब जराशी जपत उराशी
खार कुठेही सहज उनाडे
कोकिळ गाई सुमधुर भाषी
पाखरनक्षी नभपट व्यापी
घेत भरारी भरभर भारी
काढत येती अनवट काही
रंगकमानी क्षितिजकिनारी
गोप-गुराखी चरवत गायी
पाहुन सोने हिरवट घेती
माड नदीच्या अलगद कानी
गूज स्वतःचे कळवुन देती
पाय निघेना रविकिरणांचा
रम्य नजारा मनभर दाटे
सौख्य पहाया म्हणुनच येती
रोज नव्याने सुभग पहाटे ...
©अनिल विद्याधर आठलेकर
बुधवार, १२ डिसेंबर २०१८
Comments
Post a Comment