माझ्यापाशी रडला आहे काळोखाचा तुकडा
खोलीने गांगरला आहे काळोखाचा तुकडा
डोहामध्ये पडला आहे काळोखाचा तुकडा
दु:ख पाहिले आहे केवळ मी धैर्याने त्याचे
माझ्यापाशी रडला आहे काळोखाचा तुकडा
असेल आई त्याचीसुद्धा स्वप्नामध्ये आली,
दुलईमध्ये निजला आहे काळोखाचा तुकडा
अजून देऊ काय सुखा मी तुला पहुडण्यासाठी?
कसाबसा अंथरला आहे काळोखाचा तुकडा
फार स्वतःला जपून वावर लख्ख उजेडामध्ये,
तुझ्यातसुद्धा दडला आहे काळोखाचा तुकडा
कोण नदीच्या काठी आले होते कातरवेळी?
बेवारस सापडला आहे काळोखाचा तुकडा
ज्याचीत्याची न लिहीलेली एक कहाणी आहे,
ज्यानेत्याने जपला आहे काळोखाचा तुकडा
फोटोग्राफरपाशी अंतर्यामी लेन्स असावी,
किती खुबीने टिपला आहे काळोखाचा तुकडा
म्हणून जोडी जमली आहे तुझी नि माझी इतकी,
तुझा नि माझा जुळला आहे काळोखाचा तुकडा ...
©अनिल विद्याधर आठलेकर
डोहामध्ये पडला आहे काळोखाचा तुकडा
दु:ख पाहिले आहे केवळ मी धैर्याने त्याचे
माझ्यापाशी रडला आहे काळोखाचा तुकडा
असेल आई त्याचीसुद्धा स्वप्नामध्ये आली,
दुलईमध्ये निजला आहे काळोखाचा तुकडा
अजून देऊ काय सुखा मी तुला पहुडण्यासाठी?
कसाबसा अंथरला आहे काळोखाचा तुकडा
फार स्वतःला जपून वावर लख्ख उजेडामध्ये,
तुझ्यातसुद्धा दडला आहे काळोखाचा तुकडा
कोण नदीच्या काठी आले होते कातरवेळी?
बेवारस सापडला आहे काळोखाचा तुकडा
ज्याचीत्याची न लिहीलेली एक कहाणी आहे,
ज्यानेत्याने जपला आहे काळोखाचा तुकडा
फोटोग्राफरपाशी अंतर्यामी लेन्स असावी,
किती खुबीने टिपला आहे काळोखाचा तुकडा
म्हणून जोडी जमली आहे तुझी नि माझी इतकी,
तुझा नि माझा जुळला आहे काळोखाचा तुकडा ...
©अनिल विद्याधर आठलेकर
This comment has been removed by the author.
ReplyDelete