सुनीत (शार्दूलविक्रीडित )
घेई रोज मला कवेत म्हणुनी वाटायचे आपले
एकाकीपण दूर होत, फिरुनी, वाटायचे चांगले
केव्हाही बसता समोर हसुनी आधार देई मला
चाले नित्य असेच गूज अमुचे जाणून मौनातले
मध्यान्ही सरताच खेळ दमुनी येई जसा मी घरी
जाई शीण कसा लगेच पळुनी घेताच मांडीवरी
येई नीज मला क्षणात इतकी वाटे जणू स्वर्ग तो
स्पर्शाने अवघ्या तनूत हळवी वाजायची बासरी
जाता दूर जरा कुठे निघुन मी शोधायचो भोवती
नेता येत नसे कुठेच तरिही लागायचे सोबती
माझ्यामागुनही उरी जपतसे माझ्या स्मृती अंगणी
माघारी फिरता असेल पुढती याची असे शाश्वती
झाले काय कधी कसे न कळले काही मला नेमके
गेले सोडुन दूर झाड मधुनी का एवढे लाडके ...???
~ अनिल आठलेकर, सिंधुदुर्ग
26 जानेवारी 2017

Comments
Post a Comment