"ह.म.बने, तु.म.बने" : कौटुंबिक जिव्हाळ्याची निखळ आनंदयात्रा!
आजची जीवनशैली इतकी
धकाधकीची आणि ताणतणावाची आहे की माणूस सतत कोणत्या ना कोणत्या तरी चिंतेत असतो. विवंचनेत
असतो. घरी आल्यावरदेखील हा ताणतणावाचा बोजा उतरलेला नसतो.व्हाट्स अॅप किंवा
फेसबुकवर जावं
तर एकतर त्याच त्याच पांचट विनोदाचा मारा होत असतो नाहीतर एकमेकांवर
जातींवरून वा राजकीय पक्षांवरून वैयक्तिक सबंधांत कटुता येईल इथवर विखारी टीका होत
असते. या सर्व कंटाळवाण्या दिनचर्येला टाळण्यासाठी स्वाभाविकपणे मोर्चा टीव्हीकडे वळतो.
खरं तर तिथेही डेलीसोप्सची रडारड आणि भानगडी यांचा पाऊस पडत असतो तरीही माणूस आशावादी
असतो म्हणतात ना.. त्याच आशेच्या जोरावर हातात रिमोट घेऊन चॅनेल्स बदलली जात असतात
आणि अचानक आपण एका ठिकाणी येऊन थांबतो. साधारणपणे कोणत्याही मालिकेचा अंदाज अर्ध्या
मिनिटात येतो त्यामुळे नावावरून उत्सुकता चाळवली जाऊन दोनचार मिनिटं बघू तरी म्हणून
ती मालिका पाहिली जाते आणि खरोखरच त्यामध्ये आपल्याला हवंहवंसं आणि हलकंफुलकं असं वातावरण
दिसतं आणि नकळत गालावर उमटलेल स्मितहास्य क्षणार्धात सगळा मूडच बदलून टाकतं. अशी एक
टवटवीत, हलकीफुलकी आणि आवर्जून पहावी अशी मालिका आहे सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता प्रक्षेपित होणारी सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका __ “ ह.म.बने
तु.म.बने !”
टीव्हीवरील मालिका म्हटल्या की समोर पहिलं चित्र येतं ते म्हणजे फक्त नावं आणि पात्रं बदलून ( हो तेच ते,नव्या बाटलीत जुनी दारू ) तीच ती सासू आणि सुनेमधली भांडणे दाखवणार्या सर्व मालिका किंवा प्रेमाचा त्रिकोण, विवाह्यबाह्य संबंध वगैरे रसभरीत वर्णन करून दाखवणार्या टीआरपीप्रधान मालिका. अगदी मनाला वाटेलं तेव्हा सहज टीव्ही ऑन करावा आणि समोर चालू असणार्या मालिकेने तुम्हाला गुदगुल्या करत हसवावं, तुम्हाला ताजंतवानं करावं असं फार क्वचितच घडतं. काही मोजक्याच मालिकांच्या नशिबी ते भाग्य येतं ( व! काय अवस्था आहे ! ) टीव्ही प्रेक्षक हा मूर्ख किंवा विचार न करणारा आहे आणि त्याला फक्त भानगडी किंवा भांडणं बघायला आवडतात असा निर्माता-दिग्दर्शकांचा समज झालेला आहे की काय( खरं तसं असेलही आपल्याला काय माहीत ? ) समजत नाही. असो. (गंमत म्हणजे सासू- सुनांची भांडणं सासू सुनाच बघतात त्यातून पुढे धुमश्चक्री होण्याची शक्यताही असते त्यापेक्षा हलक्याफुलक्या मालिका दाखवणे टीव्हीवाल्यांना जमत नाही काय ? हे सरकारचे डोके ठिकाणांवर आहे काय ? च्या ठेकयात झाले का ? असो. ) तर नवीनच सुरू झालेल्या सोनी मराठीने टिपिकल / पारंपरिक डेलीसोप्सचा पायंडा मोडत एक हलकी फुलकी मालिका सुजाण (म्हणजे आमच्यासारख्या हो!) रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ( नवीन हॉटेल असताना सगळे पदार्थ एकदम चविष्ट, रुचकर वगैरे असतात तोवर त्याचा फायदा घेऊन टाकायचा, पुढचं कोणी पाहिलंय? चॅनेलवाल्यांचंही तसंच असतं काय ? असावं बहुधा, असो. ) ही मालिका म्हणजे हलक्याफुलक्या कौटुंबिक सबंधांची, संवादांची निखळ आनंदयात्रा आहे. सर्वप्रथम यासाठी सोनी मराठीचे विशेष अभिनंदन आणि रसिक म्हणून आभार !
एखादा चित्रपट असो की मालिका कथा, पटकथा याबरोबरच त्यांचा सगळा डोलारा असतो तो पात्रनिवडीवर. पात्र आणि कलाकार यांची एकत्रित भट्टी जमली की पुढे येणारी लज्जत अवर्णनीयच असते. खुसखुशीत संवाद आणि चपखल पात्रनिवड या गोष्टी स्वाभाविकच मालिकेसाठी पोषक ठरतात. “ ह.म. बने...” च विषयच मुळात गोड आणि जिव्हाळ्याचा आहे. अगदी सोनी मराठीच्या भाषेत सांगायचं तर “एका कुटुंबाच्या लव्हस्टोरीचा” आहे. लेखक अमोल पाटील आणि दिग्दर्शक सचिन गोखले यांनी ही नाती इतकी सुंदर विणली आहेत की अतूट तर झालीच आहेत पण ‘क्यूट’देखील झाली आहेत. बरं, ही मालिका तशी इतर मालिकांसारखी एकाच विषयावरची/कथेवरची एकसलग मालिका नसून घरोघरी घडणार्या दैनंदिन घडामोडी, किस्से, संवाद, लुटुपुटूची भांडणं, रूसवे फुगवे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींमधून वाढत जाणारा प्रेम-जिव्हाळा अशा भावभावनांची मेजवानी आहे. इतकी रुचकर की एकदा लळा लागला की तुम्ही न चुकता ती अनुभवत बसता, त्यामध्ये रमत बसता.

“ह.म.बने..” मधील कुटुंबाचे सदस्य आहेत तत्वनिष्ठ, करारी
वडील - अप्पा ( प्रदीप वेलणकर ), खडूस पण
प्रेमळ नवर्याला व मुलांना सांभाळत संसार करणारी हसतमुख आई (उज्वला जोग ), दोन मुलं –
मल्हार (अजिंक्य जोशी ) आणि मकरंद (सचिन देशपांडे ), दोन सुना
- तुलिका (आदिती सारंगधर ) आणि हर्षदा (राणी गुणाजी ) आणि तीन नातवंडं. कुटुंबाचे कुटुंबप्रमुख
अर्थातच अप्पा आहेत. घरात दोन बायका असल्या की वाद होतात हे गृहितक आणि इतर डेलीसोप्सनी
मनावर अक्षरश: बिंबवलेलं विधान मोडून काढत या मालिकेत सोनी मराठीने दोनच नाही तर तीन
बायका एकत्र आणून त्या गुण्यागोविंदाने नांदताना दाखवल्या आहेत आणि त्या इतक्या सहजपणे दाखवल्या
आहेत की ते कुठेही कृत्रिम वाटत नाही. लहान मुलांना मोठं करत असताना पालकांना येणार्या
विविध अडचणी, समस्या आणि त्याबाबतचे उपाय अगदी हसत खेळत, रंजक पद्धतीने संगितले आहेत, सादर केले आहेत. त्याचबरोबर
कुटुंबात असणार्या तीन भिन्न शैलीच्या, व्यक्तिमत्वाच्या स्त्रिया, त्यांच्यातील नातेसंबंध, क्षणिक ओढाताण त्यातून काढला
जाणारा ( काढता येण्याजोगा ) सुवर्णमध्यही अतिशय संयतरित्या दाखवला आहे. जवळपास प्रत्येक
घरातील प्रत्येक प्रश्न असावा असे प्रसंग हलक्या
फुलक्या पद्धतीने मांडून त्याचं उपदेशाचे डोस वाटणार नाहीत अशा प्रकारे निराकरण करण्याचा
प्रयत्न फारच प्रभाव पाडतो. तत्वनिष्ठ सासरे असणार्या कुटुंबातील सुनेने गणेशोत्सव मिरवणुकीत केलेला ‘डॅशिंग’ डान्स असो वा केवळ योगायोगाने घडणार्या वाईट
गोष्टींमुळे साजरा न केला जाणार्या अप्पांच्या वाढदिवसाचा संपूर्ण कुटुंबाने घातलेला
सरप्राइज पार्टीचा यशस्वी घाट असो. प्रत्येक प्रसंगाच्या शेवटी फार काही डामडौल न करता
महत्वाचं संदेश देण्याचं काम ही मालिका इतकं चोख बजावते की आपल्याच घरातील हे सगळे
सदस्य आहेत व यातील प्रसंग आपल्याच घरात घडत आहेत असा भास झाल्यावाचून राहत नाही. काही
सुंदर सुंदर संवाद यादरम्यान येऊन जातात. वाढदिवस साजरा करायला नकार देणार्या आप्पांना
समजावताना मकरंद लाखमोलाचं सत्य बोलतो :
“ अप्पा, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहात
त्यामुळे आम्ही किती सुखी आहोत. हा वाढदिवस तुमचा वाढदिवस म्हणून नाही तर तुम्ही आम्हाला
लाभलात त्याचं सेलिब्रेशन आहे..”
किती गोडवा आहे पहा नात्यात, किती ओलावा आहे शब्दात ! आज
एकमेकांच्या जीवावर उठणारे भाऊ, वडिलांचा प्रसंगी आईचाही छळ करणारे, त्यांची हत्या करणारेही अधम लोकही या जगात असल्याचे
बातम्यांमधून समोर येत असताना आईवडिलांवर प्रेम असणारी ही मुलं, सुना आणि आजी आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी, काकाकाकूंशी
आईबाबांइतकीच सलगी असणारी नातवंडं पाहणं किती आल्हाददायक आहे. सासू-सासरे, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-वहिनी, दीर-जाऊ, पुतण्या-पुतणी, काका-काकू
प्रत्येक नात्यांतील ओलावा, वीण अगदी घट्ट विणलेली पाहून आनंदाचं
उधाण येतं. अशा मालिका समाजप्रबोधन किती घडवतील, घडवतील की नाही-ते
माहीत नाही पण मारधाड-भानगडी-भांडणं-कलह यांनी युक्त अशा मालिका-चित्रपट टीव्हीवर दाखवण्यापेक्षा
अशा मालिका दाखवल्या तर वाईट संस्कार होणार नाहीत एवढं मात्र निश्चित. भडक सादरीकरण
न करताही नाजूक विषय उत्तमरीत्या हाताळता येतो आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरू शकतो हे या मालिकेद्वारे
सिद्ध करण्यात सचिन गोखले कमालीचे यशस्वी झाले आहेत. अशा हलक्याफुलक्या मालिका मनावरचं
मणामणाचं ओझं कमी करतात, ही फारच आनंदाची गोष्ट आहे.
यातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल
काय बोलायचं? प्रदीप वेलणकर आणि उज्वला जोग कसलेले कलाकार. उज्वला जोग यांचा
सात्विक, सोज्वळ अभिनय आणि मधाळ, प्रेमळ
आवाज त्यांचं नाव घेताक्षणी भास व्हावा इतका सवयीचा आहे. तेच प्रदीप
वेलणकर यांच्याबद्दल! एक तत्वनिष्ठ, करारी आणि धीरगंभीर बाप त्यांचं
नाव घेताच आपोआप समोर येतोच आणि या दोघांची जोडी तर कमाल कॉम्बिनेशन. अगदी आदर्शवत! नवर्याचा आब न ढळू देता लेकरांच्या निर्णयाला पाठींबा देणारी
आई व त्या आईकडे कृतकृत्य होऊन पाहणार्या अप्पांची दहबोली दोघांनी जबरदस्त साकारली
आहे॰ ( विशेष म्हणजे हीच जोडी ‘ या गोजिरवाण्या घरात’ नामक एका मालिकेतही जवळपास अशाच भूमिकेत होती ) आदिती सारंगधर तर कमाल ! या
मालिकेतील ती “अँग्री यंग वूमन” तिचा टिपिकल
मुंबईया अॅटीट्यूड तिच्याइतकाच कमाल आहे. एकाचवेळी गृहिणी, आई
व स्वत:च्या इच्छा आकांक्षांना मनमुरादपणे मूर्तरूप देणारी तुलिका भावते, आवडते. राणी गुणाजीने ‘वर्किंग
वूमन’ उत्तम साकारली आहे. मुलीविषयी नेहमीच काळजीत असणारी आई, धाकट्या जाउशी जुळवून घेणारी वहिनी, नोकरी करणारी बायको
अशी हर्षदा छान उभी केलीय राणी गुणजीने. सचिन देशपांडे व अजिंक्य जोशी दोघांची केमिस्ट्री
झकास! दोघांचे समयसूचक विनोद, बंधुप्रेम, गोसिप्स शेअर करणं, लहानपणीच्या गोष्टी आठवून त्यात
रमणं-- सगळ्या गोष्टी अगदी आपल्यालाही नॉस्टाल्जिक करणार्या. नातवंडं तर धमाल आहेत.
केदार आगास्कर, सखी दातार आणि पूर्वी शाह या बच्चेकंपनीने अक्षरश:
धम्माल केलीय. तिघंही सहज वावरतात. सहज, नैसर्गिक अभिनय! एक युनिट
म्हणून पूर्ण टीम एकदम बेस्ट! अगदी सांघिक कामगिरीच्या जोरावर आयसीसी रॅंकिंगमध्ये
अव्वल येण्याइतपत सॉलिड!
अशी निखळ मनोरंजन करता करता नात्यांची वीण घट्ट करणारी, संयुक्त
कुटुंबपद्धतीचं महत्व सांगणारी, सजग पालकत्वाची शिकवण देणारी
आपल्या रोजच्या जगण्याशी तुलना करता येईल अशी सुंदर मालिका जर टीव्ही दाखवणार असेल
तर त्याला इडियट बॉक्स तरी कसं म्हणायचं ? आवर्जून पहा ...
“ ह.म.बने तु.म.बने – लव्हस्टोरी एका कुटुंबाची!
:)
@अनिल विद्याधर आठलेकर

कमाल !!!! कमाल लिहीलं आहेत सर !! सुंदरच आहे ती मालिका
ReplyDelete