"कातरवेळ" ( वृत्त:भूपती )
मनडोह डहुळतो व्यथा अनामिक छळते
कोठली दिशा कोठले सुकाणू धरते
नेहमी चलबिचल होते कातरवेळी
का ऊन मुके संध्यासमयी हळहळते ?
नेमक्या आणती इथेच पाउलवाटा
अंगावर अवघ्या, तिन्हिसांजेचा काटा
बेधुंद तरीही गूढ वाटतो वारा
काठावर का या खिन्न स्मृतींच्या लाटा ?
आतून हाक इतक्यात कुणाची येते
हातात स्वतःच्या हात स्वतःचा देते
लागते न कोणी सोबत कातरवेळी
एकेक अनुभुती पूर्णत्वाला नेते
सोसून त्रास प्रत्येक, उजळते आहे
तावून-सुलाखुन तेज वाहते आहे
जगण्यास लाभते आहे इतकी ऊर्जा,
दररोज नवे आयुष्य उमगते आहे... !
~ अनिल वि. आठलेकर, सिंधुदुर्ग
अंगावर अवघ्या, तिन्हिसांजेचा काटा
बेधुंद तरीही गूढ वाटतो वारा
काठावर का या खिन्न स्मृतींच्या लाटा ?
आतून हाक इतक्यात कुणाची येते
हातात स्वतःच्या हात स्वतःचा देते
लागते न कोणी सोबत कातरवेळी
एकेक अनुभुती पूर्णत्वाला नेते
सोसून त्रास प्रत्येक, उजळते आहे
तावून-सुलाखुन तेज वाहते आहे
जगण्यास लाभते आहे इतकी ऊर्जा,
दररोज नवे आयुष्य उमगते आहे... !
~ अनिल वि. आठलेकर, सिंधुदुर्ग
Comments
Post a Comment