कविता


सांज ओवून सहज
एका उन्हाच्या गाण्यात
खडा टाकावा हळूच
तशी सोडली पाण्यात


केला मोहाचा पाचोळा
आणि भरला पोत्यात
जीव अडकूच नये
तसा कुठल्या मोत्यात

सुखे पाठवणी केली
नाही गाळला टिपूस
पुन्हा होऊ नये त्रास
पुन्हा भरू नये कूस

स्वतः बुडवली हौस
आणि वाटले सुटलो
छळवादाला उन्हाच्या
होतो पुरता विटलो

तरी आली वर एक
ओळ उलटी-पालटी
कशी सांभाळू कळेना
आहे कविता एकटी ...

©अनिल वि. आठलेकर
मोबाइल : ९७६२१६२९४२

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !