किमया...
तावून सुलाखुन ऊन, नित्य प्राशून, उजळली काया
उमटती तनूवर ठसे, लागती जसे, स्पर्श बोलाया
ही नशा वेगळी, खास, हवासा भास, हवीशी भाषा
हा अविरत चाले असा कशाचा धोशा..?
एकेक पान सळसळे, दिसे आगळे, रूप झाडाचे
अडकली जणू वादळे, घटीका-पळे, सावली नाचे
केशरी छटा निमिषात, झिरपता आत, खुले हिरवाई
लाजते किती गालात नाजुका जाई...
का तृणपाते थरथरे, दिशा हंबरे, थांबती वाटा
का कृमिकिटकांची फौज, वाढवी मौज, करी बोभाटा
ओढ्यात पाहती रूप, किती अप्रूप, नटोऱ्या वेली
का झुळूक आहे इतकी मंतरलेली?
न्हाऊन शुचिर्भुत घरे, लख्ख चेहरे, न्याहळी दृष्टी
नवरविकिरणांची प्रभा, दाखवी नभा, वेगळी सृष्टी
दिवसाच्या हाती हवा,असा ताजवा, देतसे लिलया
ही पहाटमहिमा असे ईश्वरी किमया...
©अनिल विद्याधर आठलेकर
दिनांक १ डिसेंबर २०१८

Comments
Post a Comment