याक ढॉर खय पाठी ऱ्हवता


केला तर सगळा हय जमता,
माका खय पण तितक्या कळता ?

सणाकसुद्धा तुका बोलयता?
झील तुझो हो भारी दिसता

माझो कुणगो आसा थंयसर
मेर तुझ्या कुणग्याची वळता

हांबडतय मी पुन्हा पुन्हा पण
याक ढॉर खय पाठी ऱ्हवता

चलला ता चललाहा हयसर
कुत्रो खाता, आंधळो दळता

व्हये कित्या ते सुके गजाली?
येळ इली की कोणव नसता

टीव्हीवरचे बघुन बातमे
चाकरमानी डोळे पुसता

तुझीच स्वप्ना पडतत निसती
म्हणान ह्या उसरा उज्वाडता ...

~ अनिल विद्याधर आठलेकर
चेंदवण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
मोबाईल -- 9762162942

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !