मालवणी बोलीतील #पहिली सुमंदारमाला वृत्तातील कविता !

 #खेळ

तुझे सारखे भास झाले तरी नाय दिस्नंस, कसा सांग जम्ता तुका?
तुझी जाग माझ्यात शोधून शोधून किती रोज डोळ्यांत जम्तंत दुका
हवा घेव्न येता तुझी बातमी आणि जाता हळू फक्त खेटानशी
कळी सोमती गॉड फुल्ता मनाची जरी नाय दिस्ना तशी हेरशी

मनाच्याच रस्त्यान जाता कुकारो मनाच्याच रस्त्यात उठ्तंत ठसे
तरी सांग माझ्या मनाआतले बातम्ये हे तुका रोज कळ्तंत कसे?
तुका एकदा काय वाटेत बघ्लंय नशा फक्त आसा तुझी बाधली
तुझ्यासारखी फक्त दिस्ली फुला आणि पांदीत काया तुझी भेटली

सकाळी सकाळी तुका भेटताना किती वाटली लाज सांगा कशी
तुझो हात हातात होतो त्यवा वीज  आंगार माझ्याच पड्ली जशी
तुझा रूप आसा किती देखणा गो, पुरो जीव जाग्यार जाता जसो,
नको याद काढू अशी आणखी तू नको खेळ खेळा मनाचो असो ...

~ अनिल विद्याधर आठलेकर
चेंदवण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
मोबाईल -- 9762162942

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !