कलर्ड
आम्ही जन्माला येतो तेव्हा
आणि मरतो तेव्हाही
असतो
केवळ कृष्णवर्णीय
तुमचे मात्र बदलत जातात रंग
ऋतू-काळ-वेळ-आजारानुसार
वेगवेगळे..
आणि
तुम्ही आम्हाला म्हणता,
"कलर्ड!!!"
"कलर्ड!!!"
- भाषांतर/अनुवाद : अनिल वि. आठलेकर
- मूळ फ्रेंच कवी : Léopold Sédar Senghor
Comments
Post a Comment