चूकही तितकीच सुंदर पाहिजे


देखणी शिक्षा तुला जर पाहिजे,
चूकही तितकीच सुंदर पाहिजे

कारणे आहेत पुष्कळ यायला
एकदा बोलावले तर पाहिजे ?

पॉश प्रेमाची तुझी वास्तू नको,
आपले वाटेलसे घर पाहिजे
 
ओळ पर्यायी तुझी चालेलही,
पण हिची सारी तिला सर पाहिजे
 
एवढा चिंतेत का पडलास तू ?
की तुला याचेच उत्तर पाहिजे ...

~ अनिल वि. आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !